सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (12:02 IST)

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक Entry

हुमा कुरेशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आर्मी ऑफ द डेड’ या सिनेमातून हॉलिवू़डमध्ये एण्ट्री करतेय. जॅक स्नायडर दिग्दर्शित ‘आर्मी ऑफ द डेड’ चा धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. या सिनेमात झोंबी वॉर पाहायला मिळणार आहे.
 
या सिनेमात हुमा गीता नावाची भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हुमाची एक झलक पाहायला मिळतेय. या सिनेमात झोंबींपासून शहराला वाचवण्यासाठी पुकारलेलं युद्ध पाहायला मिळणार आहे. यासाठी काही तरुणांची फौज झोंबीं विरुद्ध लढण्यासाठी सज्ज असल्याचं दिसतंय. हुमा या फौजेतील एक तरुणी आहे. त्यामुळे या सिनेमात तिचा धडाकेबाज अंदाज पाहायला मिळू शकतो.
 
                हुमाच्या या पोस्टवर अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. हुमा कुरेशी लवकरच अक्षय कुमारसोबत बेलबॉटम या सिनेमातही झळकणार आहे.