शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: कॅलिफोर्निया , सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (12:32 IST)

'ला ला लॅण्ड'चे नाव घोषित झाल्यानंतर मूनलाइटला मिळाला बेस्ट चित्रपटाचा अवॉर्ड

ऑस्कर 2017मध्ये फार मोठी चुकी झाली आहे. गोष्ट जेव्हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाचे नाव घोषित करण्याची वेळ आली तेव्हा 'ला ला लॅण्ड'चे नाव घोषित करण्यात आले. ला ला लॅण्ड'ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाच्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आलेल्यांना शब्दच सुचत नव्हते. मात्र अवघ्या काही क्षणांतच त्यांच्या या आनंदावर विरजण पडले. वितरकांच्या चुकीमुळे ' ला ला लॅण्ड'ला सर्वोत्कृष्ट चित्रटाचा पुरस्कार घोषित झाला मात्र अवघ्या काही सेकंदात ही चूक सुधारण्यात आली आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'मूनलाईट'चे नाव घोषित करण्यात आले. या गोंधळानंतर कुणाच्या डोळ्यात अश्रू तर कुणाच्या ओठांवर हसू.. असे चित्र दिसू लागले. ' कभी खुशी कभी गम'चा हा अनुभव ऑस्कर सोहळ्यातील उपस्थितांना आला.