गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (13:04 IST)

काय सांगता, आता हॉलिवूड चित्रपट मराठीत

हॉलिवूड चित्रपटबघण्याची आवड ठेवणाऱ्या रसिकांसाठी चांगली बातमी; आता हॉलिवूड चित्रपटाची मेजवानी घरबसल्या आपल्या मराठी भाषेत मिळणार आहे. ज्यांना हॉलिवूड चित्रपट बघण्याचा छंद आहे. त्यांच्यासाठी  ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'अल्ट्रा हॉलिवूड ' या यू ट्यूब चॅनल ने बहुचर्चित एकापेक्षा एक हॉलिवूड चित्रपटांची मेजवानी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आणि ते ही चक्क मराठीत .प्रेक्षकांकडून ह्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा अल्ट्रा मीडिया आणि  एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ यांनी व्यक्त केली आहे    
या चॅनल वर ‘अगेंस्ट द वाइल्ड II’, ‘बार्क रेंजर’, ‘ज्युरासिक गॅलेक्सी’, ‘सिजलिंग बेबी पांडा’, ‘रसेल मॅडनेस’, ‘कॉन्ट्रैक्ट टू किल’, ‘द डिफेंडर’, ‘वेक ऑफ़ डेथ’, ‘द स्टोलन प्रिंसेस’, ‘एयर 3’, ‘एयर 4, ‘एयर 5’ यासारखे अनेक गाजलेले हॅालीवूड चित्रपट पहायला मिळणार आहेत. अल्ट्राच्या ‘हॉलीवूड मराठी’ व ‘अल्ट्रा किड्स’ या यूट्यूब चॅनलच्या विभागात मराठीत डब केलेले गाजलेले हॉलीवूड आणि अॅनिमेशन चित्रपट पहाता येणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांची चंगळ आहे.