1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (15:55 IST)

भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम

Rules for hoisting the Indian National Flag Independence Day In Marathi Webdunia Marathi
भारतीय झेंडा संहिता 2002 नुसार देशभरात झेंडा कुठे आणि कसा फडकवावा याबाबतचे स्पष्ट नियम देण्यात आले आहेत.
 
सरकारी इमारत, सरकारी निवासस्थान, सरकारी कार्यालय या ठिकाणी झेंडा फडकवता कोणती काळजी घ्यावी याचेही निर्देश यात आहेत.यापैकी काही नियम जाणून घेऊया,
 
• झेंडा फडकवताना त्याला सन्मानाचे स्थान दिले पाहिजे.
 
• झेंडा स्पष्ट दिसेल अशा ठिकाणीच तो फडकवला पाहिजे.
 
• सरकारी आस्थापनांवरती रविवारसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही झेंडा फडकला पाहिजे.
 
• झेंडा सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत फडकवला जाईल. हवामान कसेही असले तरीही.
 
• झेंडा वेगाने वरती चढवला पाहिजे आणि खाली उतरवताना धिम्या गतीने, सन्मानाने काढला पाहिजे.
 
• फाटलेला किंवा मळलेला झेंडा फडकवता येणार नाही.
 
• कोणत्याही व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी अभिवादन करताना झेंडा खाली आणता येणार नाही.
 
• कोणताही इतर झेंडा राष्ट्रध्वजापेक्षा वरती फडकवता येणार नाही.
 
• कोणतीही वस्तू ध्वज-दंडाच्या वरती ठेवता येणार नाही.
 
• झेंड्याचा उपयोग इतर कुठल्याही प्रकारच्या कामासाठी करता येणार नाही.