स्वातंत्रेची उपभोगलीत चौरह्यात्तर वर्षे ,
सांगायला पण होतोय, तितकाच हर्ष,
फुकाफुकी नाही हो मिळालं मला हे सगळं,
बलीदान वीरांचे झाले, म्हणून हे आगळ,
घरदारांवर सोडलं पाणी कित्येकांनी,
तीक्ष्ण गोळ्यांनी छिन्न केली छाती अनेकांनी,
मान तिरंग्याचा अबाधीत ठेवला, शुरानीं,
तरुण पणी जीव बहाल केला कित्येकांनी,
खूप बदल झालेत या इथं या दरम्यान,
खुर्ची चे राजकारण सुरू झालं,
फार महान,
प्रगती खूपच झांली मात्र अनेक क्षेत्रांत,
गरुडझेप घेतली की हो आम्ही आकाशात,
तसा मी ही समाधानी आहे, आहे त्यामध्ये,
नेहमीच "नेक"असावेत आपले इरादे!
मूल्य जपावीत आपली आपण, माना ने,
शत्रू जर मान वर काढेल तर त्यास थोपवाव शौर्याने,
कच कधी खाऊ नका, धीर कधी सोडू नका,
अजुन ही तरुण आहे मी, हिंमत तुम्ही हरू नका,
जायचंय खूप खूप दूर वर मला तुमच्या सवे,
मनगटात तुमच्या मात्र बळ यायला हवे,
मग नाही होणार कोणाचीच हिंमत कधींच हल्ल्याची,
दहा शत्रूस पुरेल एक भारतीय,हीच आहे शक्ती माझी!!!!