सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (18:12 IST)

"जन-गण-मन" राष्ट्रगीत गाण्याचे नियम

भारत देशाचे देशाचे राष्ट्रगीत "जन-गण-मन" हे नोबेल पारितोषिक विजेता रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेमध्ये लिहिले आहे. २७ डिसेंबर १९११ रोजी राष्ट्रीय कोंग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रगीत सर्वप्रथम गायले गेले.
 
ह्या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
देशभरांत म्ह्टले जाणारे राष्ट्रगीत हे पाच कडव्यांपैकी फक्त पहिले कडवे आहे.
 
राष्ट्रगीत गाण्याचे नियम
राष्ट्रगीत गाताना किंवा ऐकताना सावधान स्थितीतच उभे राहून राष्ट्राला वंदन करुनच हे गीत म्हणावे.
राष्ट्रगीताचे उच्चारण स्पष्ट असावे.
राष्ट्रगीत हे नेहमी समूहाने कुठल्याही वाद्याशिवाय 52 सेकंदात म्हणायचे असते.
काही वेळेस हे गीत संक्षिप्त रूपात गायले जाते त्याचा कालावधी 20 सेकंद आहे.
राष्ट्रगीत गाताना त्याचा अपमान व निंदनीय प्रकारचे कृत्य करणे कायदयान्वये गुन्हा आहे.
हेतूपूर्वक राष्ट्रगीत गाण्यार्‍यांना थांबवणे किंवा समूहातील गाण्यात व्यत्यय आणणे गुन्हा आहे.
राष्ट्रगीतासाठी कधीही अपशब्द वापरू नये.
 
जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे
अहरह तव आह्वान प्रचारित
शुनि तव उदार वाणी
हिन्दु बौद्ध शिख जैन
पारसिक मुसलमान खृष्टानी
पूरब पश्चिम आशे
तव सिंहासन पाशे
प्रेमहार हय गाँथा
जन गण ऐक्य विधायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे
 
पतन-अभ्युदय-बन्धुर-पंथा
युगयुग धावित यात्री,
हे चिर-सारथी,
तव रथचक्रे मुखरित पथ दिन-रात्रि
दारुण विप्लव-माझे
तव शंखध्वनि बाजे,
संकट-दुख-त्राता,
जन-गण-पथ-परिचायक जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे
घोर-तिमिर-घन-निविड़-निशीथे
पीड़ित मुर्च्छित-देशे
जाग्रत छिल तव अविचल मंगल
नत-नयने अनिमेष
दुःस्वप्ने आतंके
रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमि माता,
जन-गण-दुखत्रायक जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे
 
रात्रि प्रभातिल उदिल रविछवि
पूर्व-उदय-गिरि-भाले,
गाहे विहन्गम, पुण्य समीरण
नव-जीवन-रस ढाले,
तव करुणारुण-रागे
निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा,
जय जय जय हे, जय राजेश्वर,
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे