शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Updated : रविवार, 14 ऑगस्ट 2022 (16:49 IST)

Independence Day Wishes स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence day wishes
आज सलाम आहे त्या वीरांना 
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...
ती आई आहे भाग्यशाली 
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे 
हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
************************************
देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी...
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे...
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
************************************
उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवीला !
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेविते माथा
************************************
ना धर्माच्या नावावर जगा ना...
ना धर्माच्या नावावर मरा...
माणुसकी धर्म आहे या देशाचा...
फक्त देशासाठी जगा...
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
************************************
मनात ठेवू नका द्वेष, 
मनातून काढून टाका हा द्वेष, 
ना तुमचा ना माझा, 
ना त्याचा ना कुणाचा 
हा देश आहे आपल्या सर्वांचा. 
जय हिंद जय भारत.
************************************
देशाला मिळालं स्वातंत्र्य 
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, 
चला पुन्हा उधळूया रंग 
आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण...
वंदे मातरम्.
************************************
निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत नि‍नादत राही
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
************************************
आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचे
************************************
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
************************************
रंग, रूप, वेश,
भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
************************************