मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

गांधीजींना पूजणारे गाव

PR
ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात भतरा गावाला राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अतिशय प्रेम आहे. कारण या गावात महात्मा गांधींचे मंदिर आहे. विशष, म्हणजे येते गांधीजींची कांस्य मूर्ती सिद्धासन अवस्थेत आहे. या मूर्तीची रोज पूजाअर्चना केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती होते. प्रसाद वाहिला जातो. येथील स्थानिक लोक गांधीजींचे दर्शन केल्यानंतरच आपल्या रोजच्या कामाची सुरुवात करतात.

PR
या मंदिराची कल्पना माजी आमदार अभिमन्यू कुमार यांना सुचली. ते रेढाखोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी सन 1971 मध्ये या मंदिराची निर्मिती केली. 11 मीटर लांब व साडेसहा मीटरहून रूंद आणि 12 मीटर उंच या मंदिराला पूर्ण करण्यासाठी 3 वर्षे लागली.यात एक मीटरपेक्षा जास्त उंचीची गांधीजींची मूर्ती येथील स्थानिक कला महाविद्यालयाच्या कलाकाराने तयार केली आहे.

PR
26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबरला येथे विशेष पूजेचा कार्यक्रम होतो. आजूबाजूच्या गावातील लोक पूजेसाठी येतात. दुसर्‍या मंदिराच्या परिसरात जेथे गरूड किंवा एखादा स्तंभ असतो. तसाच या मंदिराच्या परिसरात अशोक स्तंभ आहे. मंदिरात भारतमातेची प्रतिमा आहे तिच्या हातात अशोक स्तंभ आहे. किमान दीड हजार लोकसंख्या असलेले हे गाव देशभरात या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.

छायाचित्र : सौजन्य गांधी मंदिर