इराणमधील विमान अपघातात 17 ठार
इराणमधील मस्कत शहरात शुक्रवारी झालेल्या विमान अपघातात किमान 17 प्रवासी ठार तर 19 प्रवासी जखमी झाले आहेत. गेल्या 10 दिवसात इराणमध्ये प्रवासी विमानाला झालेला हा दुसरा मोठा विमान अपघात आहे. तेहरानहून मस्कतकडे जाण्यास हे विमान निघाले होते. अचानक विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आग लागली व त्यात किमान 17 प्रवासी ठार तर 19 जखमी झाले, असे खोरासन प्रांताचे उपराज्यपाल धारेमान रशीद यांचा हवाला देत इराणची वृत्त वृत्तसंस्था आयआरएनएने सांगितले. रशियन बनावटीच्या या ल्युशिन विमानात 153 प्रवासी होते. सर्व मृत व जखमी प्रवाशांची सुटका करण्यात आली असून विमानाला लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात आली असल्याचेही रशीद यांनी सांगितलेइराणचे दूसर्या क्रमांकाचे शहर असलेल्या मस्कतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला.