शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

मुंबई हल्‍ल्‍यातील दहशतवाद्यांना पाकचे अर्थसहाय्य

मुंबई हल्‍ल्‍यात सहभागी दहशतवाद्यांना परिवहन, निवास आणि आर्थिक मदत लश्कर-ए-तैयबाच्‍या पाच दहशतवाद्यांनी उपलब्‍ध करून दिल्‍याचा आरोप ठेवण्‍यात आला असून या संदर्भात त्‍यांच्‍यावर पाकिस्तानी आतंकवाद विरोधी न्‍यायालयात आरोपपत्रात सादर करण्‍यात आले आहे.

फेडरल इन्‍व्‍हेस्टिगेशन एजन्‍सीच्‍या विशेष तपास पथकाने शनिवारी रावळपिंडीच्‍या दहशतवाद विरोधी न्‍यायालयात लश्कर ऑपरेशन प्रमुख जकीउर रहमान लखवी, संपर्क तज्‍ज्ञ जर्रार शाह, हमाद अमीन सादिक, शाहिद जमील रियाज आणि अबु अल कामा या पाच दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल करण्‍यात आले आहे.

मुंबई दहशतवादी हल्‍ल्‍याचा तपास फेडरल इन्‍व्‍हेस्टिगेशन एजन्‍सी करीत आहे.