सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (21:32 IST)

Iraq : इराकच्या विद्यापीठाला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू

fire
उत्तर इराकमधील अर्बिल येथील  एका विद्यापीठात लागलेल्या आगीत 14 जण ठार तर 18 जण जखमी झाले . विद्यापीठाच्या वसतिगृहात शुक्रवारी सायंकाळी ही भीषण आग लागली. स्थानिक आरोग्य संचालनालयाच्या प्रमुखांनी ही माहिती दिली.
 
माहिती देताना आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांनी सांगितले की, अर्बिलच्या पूर्वेला असलेल्या सोरान या छोट्याशा गावात एका इमारतीला आग लागली. सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.
 
इराकमधील एका विद्यापीठात शुक्रवारी भीषण आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला. विद्यापीठाच्या वसतिगृहात आग लागली. या अपघातात 18 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री आग आटोक्यात आणण्यात आली. हे विद्यापीठ इराकच्या उत्तरेकडील अर्बिलमधील सोरान या छोट्याशा शहरात आहे.प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited by - Priya Dixit