शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (20:30 IST)

काबूल विमानतळावर 150 भारतीय सुरक्षित, तालीबानांनी पासपोर्ट तपासल्यानंतर सोडले

काबूल: अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावरून 150 भारतीय नागरिकांना तालीबानने ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता माहिती समोर आली आहे की तालीबानने या सर्व लोकांना सोडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व भारतीय सुरक्षित आहेत आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या लोकांनी त्यांचे पासपोर्ट तपासले आहेत. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
 
यापूर्वी तालीबानने भारतीयांबद्दल दावा केला होता की सर्व लोकांना विमानतळाच्या आत नेण्यात आले आहे. सर्व लोक सुरक्षित असल्याचा दावा करत तालीबानने अपहरणाचा इन्कार केला होता. तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वसीक यांनी ही बातमी पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे आणि असे म्हटले आहे की तालिबान असे कृत्य करत नाही.
 
विमानतळाजवळील एका कंपनीत शिफ्ट करण्यात आले होते  
अफगाणिस्तानचे स्थानिक वृत्तपत्र एटिलात्रोज यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सर्व भारतीय सुरक्षित आहेत आणि त्यांचे पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. वर्तमानपत्रानुसार, तालीबानने अलोकोझाईकडे 150 हून अधिक लोकांना हलवले होते आणि त्यापैकी बहुतेक भारतीय नागरिक होते. यामध्ये काही अफगाण नागरिक आणि अफगाण शीख यांचा समावेश होता. अलोकोझाई कंपनी हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. ताबीबन सोडल्यानंतर प्रत्येकजण काबूल विमानतळाकडे रवाना झाला आहे.
 
विशेष म्हणजे तालीबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती पाहून भारत सरकार आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यात गुंतले आहे. मात्र, अजूनही अनेक भारतीय अफगाणिस्तानात अडकले आहेत.