शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (13:55 IST)

तालिबानने काबूल विमानतळावरून सुमारे 150 लोकांचे अपहरण केले, बहुतांश भारतीय

अफगाणिस्तानकडून भारतासाठी खूप वाईट बातमी आहे. अल-इत्तेहा रुझच्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. यातील बहुतेक लोक भारतीय असल्याचे सांगितले जाते. काबूल विमानतळाजवळ या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. अल-इत्तेहा यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की अपहरणकर्ते तालिबानशी संबंधित होते आणि त्यांनी आठ मिनीव्हॅन मधून लोकांना तारखीलला नेले आहे.
 
असे सांगितले जात आहे की अपहरणकर्त्यांनी लोकांना दुसऱ्या गेटवरून विमानतळावर नेण्याविषयी बोलले होते, परंतु त्यांनी लोकांना कुठे नेले आहे, गोष्टी अद्याप स्पष्ट नाहीत. तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वासिक यांनी 150 हून अधिक लोकांचे अपहरण केल्याचा आरोप फेटाळला आहे.आतापर्यंत, भारत सरकारने अल-इत्तेहाच्या या अहवालावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्यापूर्वीच परिस्थिती पाहून, भारत सरकार  तेथून भारतीयांना बाहेर काढण्यात लागलीआहे. पण अजून देखील अफगाणिस्तानात अनेक भारतीय अडकले आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.