बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (10:00 IST)

अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतणार

अफगाणिस्तानातून भारतात परत येऊ इच्छिणारे नागरिक सुरक्षित ठिकाणी आहेत आणि त्यांना एक ते दोन दिवसात मायदेशी आणलं जाईल असं एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
 
अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी बायडन यांनी अफगाण नेत्यांवर फोडलं खापर
अफगाणिस्तानच्या अवस्थेसाठी देश सोडून जाणारे नेतेच जबाबदार आहेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.
 
अमेरिकेने अफगाण सैन्याला चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं तसंच शस्त्रास्त्रं पुरवली. पण ते लढू शकले नाहीत. काही ठिकाणी त्यांनी संघर्ष केला पण त्यांना यश मिळू शकलं नाही.
 
देशाच्या भल्यासाठी अफगाणिस्तानचे नेते एकत्र येऊ शकले नाहीत. अफगाण लोकांच्या मदतीचं काम सुरूच राहील असं बायडन यांनी म्हटलं आहे.
 
देशांनी आपल्या सीमा अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी खुल्या कराव्यात-मलाला
"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानसाठी भरीव योगदान द्यायला हवं, त्यांना अजून खूप काही करायचं आहे. त्यांनी धाडसी पाऊल उचलायलं हवं", असं शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने म्हटलं आहे. बीबीसीच्या टूज न्यूजनाईट या कार्यक्रमात ती बोलत होती.
 
2012 मध्ये तालिबान्यांनी तेव्हा पंधरावर्षीय मलालावर डोक्यात गोळीबार केला होता. त्यानंतर मलाला युकेत आहे.
 
"अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या रक्षणासाठी जागतिक नेत्यांनी विशेषत:अमेरिका आणि युकेच्या नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. अन्य देशांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी सीमा खुल्या कराव्यात", असं मलालाने म्हटलं आहे.
 
"तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं यासंदर्भात अमेरिका बेजबाबदार विधानं करत आहेत. अमेरिकेने ज्या पद्धतीने याला युद्ध संबोधलं आणि या युद्धात विजयी झालो असं जाहीर केलं त्यामुळे चुकीची प्रतिमा तयार झाली", असं मलालाने सांगितलं.