चीनमधील एका नर्सिंग होममध्ये भीषण आग, २० जणांचा दुर्दैवी मृत्यू
China News: चीनमध्ये एक दुर्दैवी अपघात घडला आहे. येथील एका नर्सिंग होममध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील हेबेई प्रांतात एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. येथील एका नर्सिंग होमला लागलेल्या आगीत किमान २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
चेंगडे शहरातील लोंगहुआ काउंटीमध्ये ही आग लागली. बुधवारी सकाळपर्यंत एकूण २० जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. आगीचे कारण तपासले जात आहे.
Edited By- Dhanashri Naik