शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

200 किलो वजनाची मॉडेल आणि कमाई लाखोंची

मॉडेल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सडपातळ बांधा व आकर्षक रूपाच्या तरुणीचे चित्र उभे राहते. सर्वच मॉडेल तरुणी शक्यतो अशाच असतात. मात्र अमेरिकेतील बॉबी वेस्ले नावाच्या एका महिलेचे वजन तब्बल 200 किलोंच्या घरात असूनही ती सफल मॉडेल आहे. 
 
43 वर्षीय बॉबीचे अनेक ब्रिटिश पुरूष चाहते आहेत. त्यांना तिचे 60 किलो वजनाचे पाय आकर्षक वाटतात. कारण त्यांना अमेरिकेत अशा महिला दिसत नाहीत, असे ती सांगते. अनेक ब्रिटिश पुरूष मोठी रक्कम खर्च करून तिच्यासोबत वेबकॅम सेशन करतात. बॉबी सुपरसाइज बिग ब्यूटिफुल वूमन मॉडेलिंग कमिटीची सदस्य आहे.
 
या कमिटीमध्ये जास्त वजनाच्या महिला मॉडेलिंग करतात. बॉबी तीन वर्षांपासून त्यांच्यासोबत जोडली गेली आहे. 20 वर्षांची असताना बॉबीला अंडर ‍अॅक्टिव्ह थायरॉईड झाला होता. तेव्हापासून तिचे वजन वाढत गेले.
 
मात्र हेच वाढलेले वजन आता तिच्या कमाईचे साधन ठरले आहे. महिन्याला ती 14 डॉलर म्हणजे 9.30 लाख रुपये कमावते. वेबकॅम सेशनसाठी विचारणा करणारे फेसबुकवर लोकांकडून तिला दररोज 40-50 मेसेज येतात. बॉबी सांगते की अनेक पुरूष त्यांना तिचे हास्य, तिचे व्यक्तिमत्त्व व शरीर पसंत असल्याचे सांगतात. ती अशी आहे की यापूर्वी त्यांनी कधीही अशी महिला पाहिले नसेल.
 
सध्या बॉबीच्या कंबरेचा घेर 91 इंच असून आपल्याकडे जगातील सर्वात मोठी कंबर असावी अशी तिची इच्छा आहे. त्यासाठी तिला अमेरिकेतील मायकलचा विक्रम मोडावा लागेल. त्याच्या नितंबाचा आकार 2013 मध्ये 99 इंच होता.
 
एवढ्या वजनामुळे बॉबीला रोजची कामे करताना समस्या येते, मात्र आपल्या वजनामुळे तिला कधीही शरमल्यासारखे वाटत नाही.