गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2026 (08:17 IST)

बांगलादेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळून २३ जणांचा मृत्यू

Padma river
बांग्लादेशच्या राजबारी येथे एक प्रवासी बस पद्मा नदीत कोसळल्याने २३ जणांचा मृत्यू झाला. ही बस ढाकाकडे जात होती आणि फेरीमध्ये चढत असताना हा अपघात झाला. अनेक जण बेपत्ता आहे. रात्रीच्या वेळी बचावकार्यात अडथळा आला होता, परंतु सकाळी ते पुन्हा सुरू करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात एक प्रवासी बस पद्मा नदीत कोसळल्याने २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून काही जण अद्याप बेपत्ता आहे. राजबारीहून ढाकाकडे जाणाऱ्या या बसमध्ये अंदाजे  ५० प्रवासी होते. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दौलतदिया फेरी टर्मिनल क्रमांक ३ समोर घडला. बस फेरीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण सुटले आणि ती पाण्यात कोसळली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस अनेक थांब्यांवरील प्रवाशांनी खचाखच भरलेली होती.
पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की, आतापर्यंत २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. ते म्हणाले की, काही लोक अजूनही बेपत्ता आहे, तर काही प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. ते म्हणाले, "रात्रीमुळे बचाव कार्य थांबवण्यात आले होते, परंतु आज सकाळी ते पुन्हा सुरू करण्यात आले. अग्निशमन दल, नौदल, पोलीस आणि इतर पथकांच्या सहकार्याने बचाव कार्य सुरू आहे." 
Edited By- Dhanashri Naik