1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. 24 people died after a boat capsized in Nigeria

नायजेरियामध्ये मोठा अपघात! अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली; २४ जणांचा मृत्यू

नायजेरियामध्ये एक बोट उलटली, त्यात किमान २४ जणांचा मृत्यू झाला. ही बोट दक्षिण नायजेरियामध्ये लोकांना अंत्यविधीसाठी घेऊन जात होती. या अपघातात किमान २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शोध आणि बचाव कार्य सुरू आहे, परंतु किती लोक बेपत्ता आहे हे लगेच स्पष्ट झाले नाही. पोलीस प्रवक्ते यांनी सांगितले की, आणखी २४ जणांना वाचवण्यात आले असून त्यांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी बोटीतील एकूण प्रवाशांची संख्या उघड केलेली नाही. प्राथमिक अहवालानुसार बोटीत तांत्रिक बिघाड झाला होता. प्रवाशांनी बोटचालकाला बोट किनाऱ्यावर ओढून आणण्यास सांगितले, परंतु त्याने नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, नावाडी घटनास्थळावरून पळून गेला, तर बोटीच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना, बायेलसा राज्य सरकारने बोट चालक आणि प्रवाशांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 
पुढील लेख
नाशिक: आरटीओ अधिकाऱ्याच्या मृत्यूमागील गूढ उलगडले, मुलगा- मुलगी आणि सुनेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल