मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

माउंट एव्हरेस्टवरुन गोळा केला 3 हजार किलो कचरा

जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर स्वच्छता मोहीम राबवली आहे. नेपाळ सरकारने 14 एप्रिलपासून ‘सागरमाथा सफाई मोहीम’ सुरू केली आतापर्यंत 3 हजार किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. कचरा पाठवण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला.
 
या मोहिमेखाली माउंट एव्हरेस्टचा बेस कँप, कँप 2 आणि कँप 3 क्षेत्रातून एकूण 10 हजार किलो कचरा हटविला जाणार आहे. बेसकॅम्पवरून पाच हजार किलो. दक्षिण भागातून दोन हजार किलो तर कँप 2 व 3 भागातून 3 हजार किलो कचरा गोळा करण्याचा संकल्प आहे. 
 
या मोहिमेवर सरकार 2.3 कोटी नेपाळी रुपये खर्च करत आहे. या मोहिमेत नागरीउड्डाण, पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय, नेपाळचे सैन्य, पर्यावरण मंत्रालय, नेपाळ गिर्यारोहण संघटना, सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समिती आणि नेपाळ पर्यटन मंडळाचे सहकार्य घेतले जात आहे. 
 
या सफाई मोहिमेदरम्यान बेसकॅम्पच्या ठिकाणी चार मृतदेह सापडले असून ते खाली आणण्यात आले आहेत.
 
जगभरातील 4 हजारांपेक्षा अधिक जणांनी माउंट एव्हरेस्ट सर केला आहे.