1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. 5.2 magnitude earthquake hits China many buildings collapse

चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंप, अनेक इमारती जमीनदोस्त

सोमवारी सकाळी दक्षिण चीनमध्ये भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ होती. भूकंपामुळे अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. अनेक इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून, काही इमारती कोसळल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू असून, उद्ध्वस्त इमारतींमध्ये लोकांचा शोध घेतला जात आहे. 
चीनमधील लिउझोऊ शहराच्या जवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे. प्रशासनाने ७,००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून, आपत्कालीन सेवा कर्मचारी अविरतपणे मदत आणि बचाव कार्य करत आहेत. उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये अनेक लोक अडकल्याची भीती आहे. 
 
चीनच्या सरकारी वृत्तसंस्था सीसीटीव्हीनुसार, भूकंपामुळे किमान १३ इमारती उद्ध्वस्त झाल्या. अनेक जण जखमी झाले, परंतु कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंपामुळे दोघांचा मृत्यू झाला. भूकंपाच्या धक्क्याने परिसरातील सार्वजनिक वाहतूक, विशेषतः रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, ती तपासानंतरच पुन्हा सुरू केली जाईल. 
भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही आणि वीज वाहिन्या, पाणीपुरवठा, गॅस सेवा व रस्ते वाहतूक सामान्यपणे सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाने लोकांना बाधित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.  
Edited By - Priya Dixit 
 
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
लाडक्या बहिणीच्या खात्यात मार्च-एप्रिलचे पैसे जमा