रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (15:31 IST)

अग्नितांडवात 58 लोकांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या व्यापारी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ही आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाने आतापर्यंत 63 मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढले आहेत.
 
जोहान्सबर्ग इमर्जन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे प्रवक्ते यांनी सांगितले की, अग्निशमन दल बचाव कार्यात गुंतले होते. या घटनेत एका मुलालाही आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीचा वापर बेघरांसाठी अनधिकृत निवासस्थान म्हणून केला जात होता आणि त्यासाठी अधिकृत भाडे करार नाही, असे ते म्हणाले. इमारतीत इतके लोक एकत्र असल्याने मदत आणि बचाव कार्यातही अडचणी येत आहेत.
 
घटनास्थळाभोवती भितीदायक दृश्ये
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, इमारतीत 200 हून अधिक लोक असण्याची शक्यता आहे. बहुमजली इमारतीला आगीचे कारण सध्या समजू शकलेले नाही. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. असे असतानाही इमारतीच्या मोठ्या भागात खिडक्यांमधून धूर निघताना दिसत होता.
 
याशिवाय बेडशीट आणि इतर वस्तूही खिडक्यांना लटकलेल्या दिसतात. लोकांनी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी या वस्तूंचा वापर केला की त्यांचे सामान परत मिळवण्यासाठी खिडक्यांमधून वस्तू फेकल्या हे अस्पष्ट आहे.