शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (21:03 IST)

फिलीपींसमध्ये 7.0 रिश्टर भूकंपाचे तीव्र धक्के

फिलीपींसमध्ये भूकंपाचे तीव्र झटके बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ही ७.० रिश्टर स्केलमध्ये होती. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे फिलीपींसपासून लांब असलेल्या पोंगडूइटान होते. या भूकंपाचे धक्के हदरवणारे होते. भूकंप आल्यावर लोकांनी घरातून पळ काढत सुरक्षित ठिकाणी पलायन केले. ७ ते ७.९ रिश्टर स्केलमधील भूकंपात घरे आणि इमारतींचे मोठा प्रमाणात नुकसान होते. तर जमिनीतील पाईपही फुटून जातात.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. भूकंपाची लक्षणे जाणवताच दुकानातील, तसेच घरातील लोकांनी सुरक्षीत स्थळी धाव घेतली. युरोपीय भूमध्ये भूकंपीय केंद्राने म्हटले आहे की, भूकंप समुद्राता सुमारे १२२ किमी लांबीवर आला होता. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल वर्तवण्यात आली होती. तसेच हा भाग भूकंपग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखला जातो.