मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (09:38 IST)

काबुल मध्ये विमानतळाच्या बाहेर स्फोट,13 अमेरिकी सैनिकांसह 72 लोक मृत्युमुखी

A bomb blast outside an airport in Kabul has killed at least 72 people
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. दरम्यान, राजधानी काबूलच्या विमानतळाबाहेर स्फोट झाल्याचे वृत्त आहे. विमानतळावरील स्फोटाच्या वृत्ताला पेंटागॉनने दुजोरा दिला आहे.या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.या दहशतवादी हल्ल्यात 13अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आहे आणि 18 जखमी झाले आहेत.
 
जो बायडन म्हणाले की, ज्याने हे केले, त्याला आम्ही क्षमा करणार नाही किंवा विसरणार नाही .काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अमेरिका,ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने आधीच व्यक्त केली होती.
दहशतवादी संघटना IS ने त्याच्या टेलिग्राम अकाऊंटवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
गुरुवारी अफगाणिस्तानमधील काबुल दोन बॉम्बस्फोटांनी हादरले. काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये 72 लोक ठार झाले आणि 143 जखमी झाले.या दहशतवादी हल्ल्यात13अमेरिकन सैनिक मरण पावले असून 18 जखमी झाल्याची माहिती पेंटागॉनच्या सुरक्षा अधिकाऱ्याने दिली.
 
या बॉम्बस्फोटांमागे आयएस (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सुरुवातीपासूनच समोर येत होते आणि रात्री उशिरा त्याची जबाबदारीही घेतली गेली. त्याचबरोबर रशियन वृत्तसंस्थेनेही तिसरा स्फोट झाल्याचा दावा केला आहे.तालिबानच्या वाहनामधूनआयईडीद्वारे हा स्फोट झाला.मात्र याची पुष्टी झालेली नाही.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बॉम्बस्फोटावर निवेदन जारी करून त्याचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- आम्ही काबूलमधील स्फोटांचा निषेध करतो. आम्ही दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करतो. हा स्फोट दाखवतो की आपल्याला दहशतवाद आणि त्याचे पालनपोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.