1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 10 ऑगस्ट 2025 (10:30 IST)

रशिया मध्ये भूकंपाचा मोठा धक्का, रिश्टर स्केलवर तीव्रता 6.0

Russia

रशियामध्ये एक मोठा भूकंप जाणवला आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी मोजण्यात आली. यूएसजीएस भूकंपाने म्हटले आहे की, "रशियातील सेवेरो-कुरिलस्कच्या पूर्व आग्नेयेस 267 किमी अंतरावर आज 19:34:07 वाजता रिश्टर स्केलवर 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला."

यापूर्वी, 30 जुलै रोजी जगातील10सर्वात मोठ्या भूकंपांमध्ये समाविष्ट असलेल्या रशियाच्या कामचटका बेटावर 8.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला होता.


या शक्तिशाली भूकंपानंतर प्रशांत महासागराच्या किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. जपान, अमेरिका आणि चिलीसारख्या देशांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता.

Edited By - Priya Dixit