पाकिस्तानात ट्रेन रुळावरून घसरली, ५ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी
Published By: धनश्री नाईक
Updated: Tue, 13 Oct 2026 (12:20 IST)
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक ट्रेन रुळावरून घसरून उलटली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहे.
मंगळवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरली. यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहे. माहितीनुसार, कराचीहून पेशावरला जात असताना पहाटे ५:१५ च्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, मुलतानमधील शेर शाह पुलाजवळ रहमान बाबा एक्सप्रेस रुळावरून घसरली.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर बचाव पथके घटनास्थळी आपले काम करत आहे. पोलिसांनी या अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि अंदाजे ३० जण जखमी झाल्याचे सांगितले.