शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (11:34 IST)

पाळीव कुत्र्याने तरुणावर गोळी झाडली

dogs
कुत्रा एक समजूतदार आणि संवेदनशील प्राणी आहे. पाळीव कुत्र्यांनी आपल्या मालकाचं रक्षण केल्याचे आपण अनेकदा ऐकतो. पण तुर्कीमध्ये पाळीव कुत्र्याकडून चुकीने गोळी झाडून आपल्या 32 वर्षाच्या मालिकांचा जीव घेण्याची घटना घडली आहे. 
 तुर्कीच्या सॅमसन प्रांतात ही विचित्र घटना घडली आहे, ज्यामध्ये एका पाळीव कुत्र्याने आपल्या 32 वर्षाच्या मालकावर चुकीने गोळ्या झाडल्या आणि नकळतपणे tyacha जीव घेतला.शिकारवर गेला असता ही घटना घडली. 
 
32 वर्षीय ओझगुर गावरेकोग्लू मित्रांसोबत शिकारीला गेला होता आणि त्याची लोडेड शॉटगन कार्बूटमध्ये ठेवत होता. दरम्यान, त्याच्या पाळीव कुत्र्याचा पाय बंदुकीच्या ट्रिगरवर पडला. बंदुकीतून सुटलेली गोळी थेट ओझगुरला लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये, ओझगुरच्या हत्येची भीती व्यक्त केली जात आहे आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी, पेट डॉगची कहाणी सांगण्यात आली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असले तरी अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit