AFG: गन पॉईंटवर मुलाखत
काबुल : अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान स्वत:ला बदलत असल्याचं ढोंग करत आहे, याचं उदाहरण समोर आली असून पत्रकारांना बंदुकीच्या दहशतीत मुलाखती घ्याव्या लागत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे.
अफगाणिस्तानमधील एका न्यूज चॅनलच्या कार्यालयात तालिबानची एंट्री झाली होती. त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये एका बाजूला एंकर तर दुसर्या बाजुला तालिबानचा कमांड कारी समीउल्लाह होता. अँकरच्या मागे काही बंदूकधारी आहेत.
धक्कादायक म्हणजे अँकरला बंदुकीचा धाक दाखवून मुलाखत देण्यात येत होती. व्हायरल झालेल्या व्हिडओमध्ये अँकरच्या मागे असलेले दहशतवादी स्पष्ट दिसून येतात. स्टुडिओ एकूण 7 दहशतवादी बंदुका घेऊन अलर्ट मोडवर उभे होते.