शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (13:18 IST)

काय सांगता, आता हरिणाला कोरोनाची लागण,हे प्रथमच घडले 'इथे '

सध्या कोरोनाने जगभरात उच्छाद मांडला आहे,लाखो लोक या साथीच्या रोगाला बळी पडले आहे,लाखोंनी आपले प्राण या रोगामुळे गमावले आहे.सध्या याचा वेग मंदावला होता,परंतु आता पुन्हा कोरोनाने आपले पाय पसरायला सुरु केले आहे.या रोगापासून कोणीही वाचू शकले नाही.माणसांसह प्राण्यांना देखील या जीवघेण्या विषाणूची लागण लागली आहे.असेच काहीसे घडले आहे.अमेरिकेत.  
 
अमेरिकेच्या कृषी विभागाने ओहायो राज्यातील एका हरिणांमध्ये कोरोनाच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केली आहे. मात्र,हा संसर्ग हरिणा पर्यंत कसा पोहोचला हे अद्याप कळू शकलेले नाही.
 
कोरोना विषाणूने मानवांना हैराण करून सोडले आहे .आता हा विषाणू प्राण्यांनाही त्याची शिकार बनवत आहे.अमेरिकेत कुत्रा,मांजर,सिंह चित्ता,गोरिल्ला यासारख्या प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाल्यानंतर,आता हरिणांमध्येही कोरोनाचे पहिले प्रकरण आढळून आले आहे. याला दुजोरा देत, अमेरिकन सरकारने शुक्रवारी सांगितले की, हरिणांमध्ये सापडलेल्या कोरोना संसर्गाचे हे जगातील पहिले प्रकरण आहे. 
 
कोणतीही लक्षणे आढळली नाहीत 
अमेरिकन कृषी विभागाने म्हटले आहे की SARS-CoV-2 संसर्ग जंगली पांढऱ्या शेपटीच्या हरिणामध्ये सापडला आहे, त्याचे कारण कोविड -19 आहे. अमेरिकेच्या ओहायो राज्यात हे प्रकरण समोर आले आहे. तर, हरिणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.हरिणांत SARS-CoV-2 संसर्ग कोठून आला हे आम्हाला माहित नाही,असे कृषी विभागाचे प्रवक्ते  यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले.हा संसर्ग मानव,पर्यावरण किंवा इतर हरीण किंवा प्राण्यांकडून पसरला असावा. वृत्तसंस्थेच्या मते, त्या प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमणाची पुष्टी केली जात आहे, ज्या प्रजाती मानवांच्या थेट संपर्कात असतात. 
 
ओहायो युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ व्हेटरनरी मेडिसिनने जानेवारी ते मार्च या कालावधीत हरिणांचे नमुने गोळा केले. त्यांच्यामध्ये नेशनल वेटेनरी सर्विसेस प्रयोगशाळेत कोरोनाची पुष्टी झाली आहे.