गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (14:25 IST)

अखेर,ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना 10 दिवसांपासून सतत उचक्या का येत आहे ?

भारतात जर एखाद्याला उचक्या येत असल्यास तर असं म्हणतात की कोणी त्याची आठवण काढत आहे.असं म्हटले जाते की,जे कोणी आठवण काढत आहे त्याचे नाव घेतल्याने उचक्या बंद होतात.
 
परंतु हे जाणून घेणे महत्वाचे आहे की उचकी येणं  देखील एक आजार असू शकते. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसनोरो हे गेल्या 10 दिवसांपासून सतत उचक्या घेत आहे.उचकी थांबत नाही म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे देखील शक्य आहे की या साठी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही  करावी लागेल.
 
याबाबत माहिती देण्यासाठी स्वतः राष्ट्राध्यक्ष जैर बोलसनोरो यांनी आपले एक चित्र ट्विट केले आहे.
 
वर्ष 2018 पासून 66-वर्षीय बोलसोनारोच्या आरोग्याबद्दल चिंता आहे, कारण 2018 मध्ये एका निवडणूक प्रचारा दरम्यान,बोलसोनारो यांच्यावर हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला होता,या मुळे त्यांच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. या घटनेत बोलसानोरो यांना 40 टक्के रक्त स्त्राव झाला आणि तेव्हापासून त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत.
 
अ‍ॅन्टोनियो लुईझ मॅकोडो, बोलसोनारोवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, 'त्यांना उपचारांसाठी सो पाउलो येथे न्यावे लागणार,जेणेकरून त्यांच्या सर्व चाचण्या करता येतील आणि शस्त्रक्रियाआवश्यक असेल तर ती देखील'केली जाईल.
 
बोलसोनारो यांचा मुलगा फ्लेव्हिओ याने सीएनएन ब्राझीलला सांगितले की, त्यांच्या पोटातून पाणी काढण्यासाठी ब्राझिलिया येथे एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागली.त्याने सांगितले की त्यांच्या वडिलांना बोलण्यात अडचण येत आहे, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले गेले.