1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (13:52 IST)

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Congratulations from the Deputy Chief Minister to the students who have passed 10th
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे, आनंदी जीवन जगावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाहून अधिक काळ तणावाखाली वावरावे लागले. तरीही शाळांतर्गत मुल्यांकनात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के तर अन्य विभागांचा निकाल 99 टक्यांहून अधिक लागला आहे. राज्यातील 99.95 टक्के विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. हे यश कौतुकास्पद असून त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे मी अभिनंदन करतो. जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करुन हे विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर असंच यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.