गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (10:33 IST)

PUBG खेळण्यास नकार दिल्यावर अल्पवयीन मुलाने आई,भाऊ बहिणीवर गोळ्या झाडल्या

लोकप्रिय ऑनलाइन गेम PUBG खेळताना एका अल्पवयीन मुलाने आपल्या कुटुंबातील सदस्यांवर गोळी झाडली. मुलाने आई , बहीण आणि भावंडांवर गोळ्या झाडल्या आहेत. PUBG खेळताना या खेळाच्या आहारी गेल्याची कबुली या 14 वर्षीय मुलाने पोलिसांना दिली आहे. ही घटना पाकिस्तानच्या पंजाब भागातील आहे. पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे की, 45 वर्षीय आरोग्य कर्मचारी नाहिद मुबारकचा मृतदेह गेल्या आठवड्यात सापडला होता. लाहोरच्या कान्हा परिसरात त्याच्यासोबत त्याचा 22 वर्षांचा मुलगा तैमूर आणि 17 आणि 11 वर्षांच्या दोन मुलींचे मृतदेह सापडले. मयत महिलेच्याअल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचे तपासात उघडकीस आले. 
 
मुलाला PUBG खेळण्याची सवय होती. या गेमच्या आहारी गेल्याने त्याने आई आणि भावंडांची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. हा अल्पवयीन मुलगा अनेक तास गेम खेळत असे, त्यामुळे त्याला काही मानसिक समस्याही असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 
नाहिदचा घटस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने अनेकदा आपल्या मुलाला अभ्यास न करण्यास आणि बहुतेक वेळा PUBG खेळण्यास मनाई केली. घटनेच्या दिवशी महिलेने मुलाला सवयी प्रमाणे खडसावले. यानंतर मुलाने कपाटात ठेवलेले आईचे पिस्तूल काढले आणि रात्री झोपेत असताना तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने आपल्या बहीण भावंडांवर गोळ्या झाडल्या. त्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलाची भावंडे झोपली होती.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलानेच आरडा ओरडा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. त्यावेळी या मुलाने आपण घराच्या गच्चीवर असून हे खून कोणी केले आहेत हे माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले. हे परवाना असलेले शस्त्र नाहिदने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने पिस्तूल नाल्यात फेकले होते. मुलाचे कापड जप्त करण्यात आले असून ते रक्ताने माखलेले आहे.
 
रिपोर्टनुसार, लाहोरमधील ऑनलाइन गेमशी संबंधित हा तिसरा गुन्हा आहे. 2020 मध्ये अशी पहिली घटना समोर आली होती. त्यानंतर येथील पोलिसांनी जीव वाचवण्यासाठी या गेमवर बंदी घालण्याची चर्चा केली होती. या गेमच्या प्रभावाखाली गेल्या दोन वर्षांत तीन तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमागे PUBG हे कारण असल्याचे पोलिसांनी त्यांच्या अहवालात सांगितले.