मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 डिसेंबर 2023 (17:24 IST)

आकाशातून कोसळणाऱ्या महिलेचा जीव मुंग्यांनी वाचविला

दैव तारी त्याला कोण मारी. एखाद्याचा जीव कोणामुळे आणि कसा वाचेल हे सांगता येणार नाही. इवल्याशा उंदरामुळे मोठ्या बलाढ्य सिंहाचा जीव वाचला होता हे सर्वानांच माहित आहे. असेच काहीसे घडले आहे एका महिलेबाबत, ही महिला स्कायडायविंग करत असताना हिचा पॅराशूट उघडला नाही. आणि ती थेट आकाशातून सुमारे 14,500 फूट उंचीवरून खाली कोसळली आणि मुंग्यांच्या वारुळावर पडली.

मुंग्यांच्या वारुळावर पडल्याने तिला मुंग्यांनी दंश केला होता मात्र सुदैवाने तिचे प्राण वाचले.  जोन मरे असे या महिलेचे नाव आहे. जोन मरे ही महिला 78 वर्षाची असून अमेरिकेतील माजी स्कायडाव्हर आहे. तिने या पूर्वी 35 वेळा विमानातून उडी घेऊन स्कायडायव्हिंग केलं आहे. ही तिची 36 वी वेळ होती. तिने विमानातून दक्षिण  कॅरोलिनाच्या चेस्टर कौंटीची घेतलेली उडी तिच्यासाठी घातक ठरली आणि उडी घेतल्यावर दुर्देवाने तिचे पॅराशूट उघडलेच नाही. ती आकाशातुन ताशी 80 मेल वेगाने कोसळू लागली. 

 काळ आला होता पण वेळ आली नव्हती.असं म्हणतात अशी काहीशी प्रचिती तिला आली.ती एवढ्या उंचीवरून मुंग्यांच्या वारुळावर कोसळली आणि तिला शुद्ध आली. तिला मुंग्यांनी दोनशेहून अधिक वेळा दंश केले होते. त्या हालचाल करू शकत न्हवत्या. मुंग्यांच्या विषारी डंखामुळे त्याच्या हृदयाला धक्का बसला मात्र हृदयाचे ठोके बंद झाले नाही. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आला. त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्या या घटनेनंतर सुमारे दोन आठवडे कोम्यात होत्या. मात्र दैव तारी त्याला कोण मारी. त्या या अपघातातून बचावल्या आणि बऱ्या झाल्या.    
 
 
Edited by - Priya Dixit