1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (14:22 IST)

बर्नार्ड अरनॉल्ट: LVHM चे अध्यक्ष,जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

Bernard Arnault: President of LVHM
फ्रेंच व्यापारी बर्नार्ड अरनॉल्ट कडे लुई व्हिटनसह 70 हून अधिक ब्रँडचे साम्राज्य आहे.14.7 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह त्यांनी आता जेफ बेझोस यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे
 
लक्झरी फॅशन ब्रँड लुई व्हिटन मोएट हेनेसी (LVMH) चे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांनी ई-कॉमर्स दिग्गज अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकले आहे.ते आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले  आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, ते 198.8 अब्ज डॉलर (सुमारे 14.7 लाख कोटी रुपये) च्या संपत्तीसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, जेफ बेझोस आता जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याची संपत्ती $ 193.3 अब्ज आहे. एलन मस्क 182.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
 
बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याची ही पहिली वेळ नाही.अरनॉल्टने यापूर्वी डिसेंबर 2019, जानेवारी 2020, मे 2021 आणि जुलै 2021 मध्ये ही कामगिरी केली आहे.खरंच, साथीच्या रोगानंतर लुई व्हिटनची कमाई वेगाने वाढली.याच्या अनेक ब्रॅण्डने वर्ष 2021 च्या पहिल्या सहा महिन्यातच विक्री करून नफा मिळवला.