काबुल विमानतळावर बॉम्बस्फोटात 13 जण ठार
अफगाणिस्तानमधील (Afganistan) काबुल विमानतळावर Kabul Airport) बॉम्बस्फोट झाला असून यात लहान मुलांसह 13 जण ठार झाले असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
पेंटॉगनने या स्फोटाच्या घटनेस दुजोरा दिला असून विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच हा स्फोट घडवण्यात आल्याचे सांगितले आहे. या बॉम्बस्फोटामागे तालिबानी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तालिबानी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अफगाणी नागरिकांना काबुल विमानतळ सोडण्यास सांगितले होते. याच ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याने लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला.