काबुल|
Last Modified गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (19:34 IST)
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. दरम्यान, राजधानी काबूलच्या विमानतळाबाहेर स्फोट झाल्याचे वृत्त आहे. विमानतळावरील स्फोटाच्या वृत्ताला पेंटागॉनने दुजोरा दिला आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात बर्यालच लोकांच्या मृत्यूची आशंका आहे.