शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (10:34 IST)

Brazil:ब्राझील मध्ये भूस्खलन आणि पुरामुळे 37जणांचा मृत्यू, 5 हजाराहून अधिक जनजीवन विस्कळीत

ब्राझीलमध्ये निसर्गाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे ईशान्य ब्राझीलमध्ये पूर आणि भूस्खलनाची घटना घडली आहे. अधिका-यांनी सांगितले - पर्नाम्बुको शहरात पावसाने सर्वाधिक नुकसान केले आहे. ते म्हणाले- एकट्या या शहरात मृतांची संख्या 35 आहे, तर 1000 हून अधिक लोकांना घरे सोडावी लागली आहेत. सुमारे 32,000 कुटुंबे राज्यात भूस्खलन किंवा पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात राहतात. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. सर्व शक्य मदत आणि बचाव उपाय केले जात आहेत.एकूण मृतांचा आकडा 37 असला तरी. या विध्वंसाची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी ब्राझीलमधील परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी पुरेशी आहेत.. 
 
अलागोस शहरात मुसळधार पावसामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. एकूण 4000 लोकांना घरे सोडावी लागली. आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 37 झाली आहे.
अतिवृष्टीमुळे पुराची समस्या भेडसावत असलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान आहे. प्रशासन मात्र आपल्या स्तरावर जनतेला मदत करत आहे.
 
पेर्नमबुको शहरातील जल आणि हवामान एजन्सीने सांगितले - यावेळी 129 मिमी ते 150 मिमी दरम्यान पाऊस पडला आहे. हा आकडा सामान्य पावसाच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे.पावसामुळे शहरातील माती कमकुवत झाल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये भूस्खलनामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेसिफे शहरात झालेल्या भूस्खलनात २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी दुसऱ्या शहरात 6 जणांना जीव गमवावा लागला.
 
प्रशासन जनतेला सर्वतोपरी मदत करण्यात व्यस्त आहे. मात्र लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.आश्रयासाठी उघडलेल्या शाळा रेसिफे शहरात लोकांना आश्रय देण्यासाठी शाळा उघडण्यात   आल्या आहेत. राज्य सरकारने सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून अलागोसमध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या परिणामामुळे 33 नगरपालिकांनी आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे.