शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (23:42 IST)

Britain's queen elizabeth passes away ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले.त्या 96 वर्षांच्या होत्या.एलिझाबेथ II ही ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणारी राजेशाही व्यक्ती आहे.त्या 70 वर्षे राजवटीत राहिल्या.बकिंघम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे की, राणीचे आज दुपारी बालमोरल येथे निधन झाले. किंग आणि क्वीन कंसोर्ट आज संध्याकाळी बालमोरल येथे असतील. ते उद्या लंडनला परतणार आहे.
 
एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर, त्यांचा मोठा मुलगा, प्रिन्स चार्ल्स, ब्रिटनचा नवीन राजा आणि राष्ट्रकुल राज्य प्रमुख म्हणून राणीच्या अंत्यसंस्कार आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे नेतृत्व करेल, बीबीसीने म्हटले आहे.
 
राणीची मुलगी, प्रिन्सेस ऍनी, आधीच स्कॉटिश राजवाड्यात त्यांच्यासोबत होती आणि त्यांची इतर मुले, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड देखील मार्गावर आहेत.धर्मादाय कार्यक्रमासाठी ब्रिटनमध्ये असलेले प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन देखील राणीला भेटण्यासाठी निघाले आहेत.