गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 4 सप्टेंबर 2022 (17:19 IST)

Cyrus Mistry Death: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू

cyrus
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबईच्या पालघर जवळ रस्ते अपघातात निधन झालं आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे वाहन वेगाने धावत असताना त्यांची कार दुभाजकाला धडकून पालटली आणि अपघात झाला कार महिला चालवत असल्याचे वृत्त आहे. या कार मध्ये चार लोक होते. त्यांची कार अहमदाबाद येथून मुंबई कडे जात होती. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात निधन झालं आहे. पालघरमधील कासा पोलीस ठाण्यानं सायरस मिस्त्रींच्या निधनाची माहिती दिली.
 
सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमधून गुजरातमधील अहमदाबादमधून मुंबईकडे येत असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कार दुभाजकाला धडकल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली.
 
सायरस मिस्त्री हे पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे पुत्र होते, जे भारतीय वंशाचे सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली उद्योगपती होते. सायरस मिस्त्री यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला. 
 
सायरस मिस्त्री आणि इतर चार जण पालघरच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला.कारमध्ये एकूणच चारजण होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे. त्यांच्या कंपनीच्या संचालकाने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. सायरस यांनी 1991 मध्ये कुटुंबाच्या पालोनजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 
///
राष्ट्रवादीच्या खासदार आणि मिस्त्री कुटुंबाच्या निकटवर्तीय सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलंय की, "माझा भाऊ सायरस मिस्त्री याचं निधन अत्यंत धक्कादायक आहे. विश्वास बसत नाहीय. आदरांजली, सायरस."
सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे माजी प्रमुख होते.
 
टाटा समूहाच्या 144 वर्षांच्या इतिहासात हे पद सांभाळणारे ते सहावे व्यक्ती बनले होते. तसंच टाटा कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पहिल्यांदाच या पदाची जबाबदारी मिस्त्री यांच्या रुपात मिळाली होती.
सायरस मिस्त्री यांच्या नावाची रतन टाटा यांनी घोषणा केली त्यावेळी सायरस यांच्या नावाची प्रचंड चर्चा झाली होती. कारण टाटा समूहाच्या बाहेर त्यांना सार्वजनिक जीवनात फारसं ओळखलं जात नव्हतं.
अखेर रतन टाटा यांच्यासोबतच्या वादानंतर त्यांना टाटा समूहाच्या प्रमुखपदावरून दूरही करण्यात आलं होतं.
 
सायरस मिस्त्री हे सध्या शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
 
सायरस मिस्त्री : आयर्लंडमध्ये जन्म, लंडनमध्ये शिक्षण
सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी यांचे सर्वात लहान पुत्र. त्यांचं कुटुंब आयर्लंडमध्ये सर्वाधिक श्रीमंत भारतीय कुटुंबांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.
 
सायरस यांचा जन्मही आयर्लंडमध्येच झाला होता. पुढे लंडन बिझनेस स्कूल येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
 
सायरस यांनी शापूरजी पालोनजी अँड कंपनीत 1991 पासून काम सुरू केलं. त्यानंतर 1994 साली त्यांना शापूरजी पालोनजी समूहाचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं.
 
सायरस यांच्या नेतृत्वात शापूरजी पालोनजी अँड कंपनीने तुफान नफा कमावला. त्यांचा व्यवसाय दोन कोटी पाऊंडवरून सुमारे दीड अब्ज पाऊंडपर्यंत पोहोचला.
 
कंपनीने जहाजबांधणी, तेल-गॅस आणि रेल्वे क्षेत्रात काम केलं. यादरम्यान कंपनीचा बांधकाम व्यवसाय दहा देशांपेक्षा जास्त देशांमध्ये पसरला. सायरस यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने भारतात अनेक विक्रम प्रस्थापित केले. यामध्ये सर्वात उंच रहिवासी इमारत, सर्वात लांब रेल्वे पूल आणि सर्वात मोठ्या बंदराचं बांधकाम या कामांचा समावेश आहे.
 
टाटा सन्सच्या संचालक मंडळात सायरस मिस्त्री यांचा समावेश 2006 साली करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार एम. के. वेणू यांच्या माहितीनुसार टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर्स सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाकडेच आहेत.