शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 14 जुलै 2021 (13:32 IST)

पाकिस्तानमध्ये बसमध्ये बॉम्ब स्फोट; 8 जणांचा मृत्यू, चिनी नागरिक प्रवासी होते

Bus bombing in Pakistan; Eight people died
इस्लामाबाद: उत्तर पाकिस्तानमध्ये बुधवारी बसमधील स्फोटात 8 जण ठार झाले.या बसमध्ये 30 चिनी नागरिक होते. जखमीं पैकीअनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार,बस वरील कोहकिस्तानमधील दसू धरणाच्या भागात चिनी अभियंत्यांना घेऊन जात होती. बसमध्ये 30 चिनी अभियंता आणि निमलष्करी सुरक्षा कर्मचारी होते.या स्फोटात दोन सुरक्षा कर्मचारीही मारले गेले.
 
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा बॉम्ब कोठे ठेवला गेला हे कळू शकले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी 8 चिनी नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.