बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अमेरिकेत कॉल सेंटर घोटाळा, २० भारतीयांना २० वर्षांची शिक्षा

अमेरिकेत करोडो डॉलर्सच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या २० जणांना २० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतात स्थित असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना करोडो डॉलर्सचा गंडा घालण्यात आला होता.
 
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटर घोटाळ्याच्या माध्यमातून हजारो नागरिकांची करोडो डॉलर्सची फसवणूक करण्यात आली. भारतात स्थित असलेल्या कॉल सेंटरमधून खोट्या स्कीमची माहिती देत फोन करण्यात आले आणि हजारो अमेरिकन नागरिंकाना गंडवण्यात आलं. पीडितांमध्ये खासकरुन वयस्कर आणि पर्यटकांचा समावेश आहे.
 
अहमदाबादमध्ये असणाऱ्या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन करुन आपण अमेरिकेच्या इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसमधून बोलत असल्याचा बनाव करत आर्थित घोटाळा करण्यात आला. डेटा ब्रोकर्सकडून मिळवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरिकांना फोन करुन पैसे न भरल्यास अटक करण्याची तसंच दंड, अमेरिकेतून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली. पीडित त्यांच्या जाळ्यात अडकले आणि मागितले तेवढे पैसे दिले.