शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 जुलै 2018 (09:02 IST)

राहुल गांधीचं भाषण संपल, लगेच फ्रान्सकडून प्रतिक्रिया आली

लोकसभेत अविश्वास ठरावादरम्यान राफेल विमानांच्या करारावर राहुल गांधी यांच्या गंभीर आरोपांनंतर नवा वाद सुरू झाला आहे.‘मी फ्रान्सच्या अध्यक्षांना दिल्लीत भेटलो होतो व त्यांनी दोन्ही देशांत राफेलबाबत कुठलाही गुप्तता करार नाही, असा खुलासा केला होता’,असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसंच राफेल विमानांच्या करारातील गुप्ततेच्या अटीबाबत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन खोटं बोलत आहेत, असा आरोप केला. राहुल गांधी यांचं भाषण संपताच यावर फ्रान्सकडून प्रतिक्रिया आली.
 
राफेल विमानांबाबत तपशील जाहीर करायचा नाही असा फ्रान्स व भारत यांच्यातील करार आहे. २००८ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या सुरक्षा करारानुसार दोन्ही देश गोपनिय माहिती सार्वजनिक करु शकत नाहीत, आमचे हात कायद्याने बांधले आहेत. या कराराचा तपशील जाहीर केल्यास सुरक्षेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, हा तंत्रज्ञान संवेदनशील करार असून व्यावसायिक स्पर्धेमुळे त्याचा तपशील जाहीर करता येणार नाही. असं स्पष्टीकरण फ्रान्सकडून देण्यात आलं आहे.