शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (11:03 IST)

Canada: कॅनडामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड , खलिस्तान समर्थकांवर आरोप

कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील एका विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची हानी झाल्याची माहिती समोर आली आहे. एका महिन्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ओंटारियो प्रांतातही महात्मा गांधींच्या पुतळ्याची हानी झाली होती. ज्याचा आरोप खलिस्तान समर्थकांवर होता. ताज्या प्रकरणातही खलिस्तान समर्थकांवर आरोप केले जात आहेत. 
 
ब्रिटीश कोलंबियामध्ये असलेल्या सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटीच्या बर्नाबी कॅम्पसमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला लक्ष्य करण्यात आले आहे. नाराजी व्यक्त करत व्हँकुव्हरच्या कौन्सुल जनरलनी या घटनेचा निषेध केला आणि दोषींना शोधून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर लवकरच कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे म्हटले आहे. 
 
 
Edited By - Priya Dixit