चिन्यांना मिळाले एलियन्सचे संकेत
परग्रहवासी म्हणजेच एलियन्सना शोधण्यासाठी जगभरातील अनेक संशोधक प्रयत्न करीत आहेत. सर्वसामान्यांमध्येही युफो किंवा एलियनशी संबंधित प्रत्येक गोष्टीबाबत कुतूहल असते. अशा स्थितीत आता चीनमधील एका उपग्रहाने काही गूढ सिग्नल्स पकडले आहेत. एलियन्स पृथ्वीवर येत असल्याचा हा संकेत असू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. याचा अर्थ परग्रहवासी आपल्या दरापर्यंत आले आहे का, असा प्रश्न काहींना पडला आहे. मात्र हे सिग्नल म्हणजे निव्वळ कॉस्मिक रे असू शकतात, असेही काही संशोधकांचे म्हणणे आहेत.
चीनच्या डार्क मॅटर पार्टिकल एक्सप्लोररने हे अनपेक्षित आणि रहस्यमय असे सिग्नल्स पकडले आहेत. बुकाँग किंवा मंकी किंग नावाच्या कृत्रिम उपग्रहाने हे सिग्नल्स पकडले आहेत. या उपग्रहाने हे प्रचंड ऊर्जा असलेल्या 3.5 अब्ज कॉस्मिक रे पार्टिकल्सचा छडा लावला आहे. त्यांची ऊर्जा 100 टेरा-इलेक्ट्रॉन व्होल्ट्स आहे. त्यामध्ये वीस दशलक्ष इलेक्ट्रॉन्स आणि पोझिट्रॉन्स आहेत.