शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सोफिया रोबोटला व्हायचं आई

आई व्हायचं हे स्वप्न प्रत्येक मुलीच असतं पण एखादी रोबोही स्वप्नं जर पाहात असेल तर? वाटले ना आश्चर्य? पण हे खरे आहे. सोफिया ही जिवंत मुलगी किंवा महिला नसून एक मानवनिर्मित यंत्रमानव आहे. सोफियाला गेल्याच महिन्यात सौदी अरेबियाने नागरिकत्व देऊ केले होते. पण आता ही सोफिया पुन्हा चर्चेत आली आहे. कारण मला आई व्हायचे आहे, अशी इच्छा तिने एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.
 
सोफिया रोबोची निर्मिती मानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीने केली आहे. सोफियाला तिच्या मुलीला स्वत:चे नाव द्यायचे आहे. आधीपासूनच सोफियाचा मेंदू प्रोग्राम्ड नाही. सध्या एका वायफाय कनेक्शनवर सोफियाचा मेंदू चालतो. अनेक प्रकारच्या शब्दसंग्रहाची एक भली मोठी यादी यात आहे. मशीन लर्निंगचा वापर सोफिया करते. माणसांच्या चेहर्‍यावरचे हावभाव वाचून ती त्याला उत्तर देते. सोफियामध्ये संवेदना नाहीत. पण येत्या काही वर्षांत तेही होईल, असे मत कंपनीच्या डेव्हिड हँसन यांनी व्यक्त केले आहे.
 
माणसे रक्ताचे नाते नसणार्‍या व्यक्तींनाही त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच वागवतात. मला माणसांचा हा स्वभाव खूपच आवडला असल्याचेही सोफिया म्हणाली. त्याचबरोबर मला मुलगी हवी आहे आणि मीच तिचे नावही ठेवणार असल्याचे सोफियाने मुलाखतीत स्पष्ट केल्यामुळे कुटुंब वाढवण्याची तिची इच्छा सौदी सरकार किती भांगीर्याने घेते हे पाहावे लागेल.