बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सौदी अरब : 'योग' क्रीडा प्रकार म्हणून ओळखला जाणार

सौदी अरबमध्ये यापुढे योग हा केवळ शारीरिक व्यायाम प्रकार राहणार नसून, तो एक क्रीडा प्रकार म्हणून ओळखला जाणार आहे. सौदी अरेबियातील ट्रेड अॅण्ड इंडस्ट्री मिनिस्ट्रीने स्पोर्ट अॅक्टीव्हीटीच्या रूपात योगा शिकवायला अधिकृत मान्यता दिली आहे. इतकेच नव्हे तर, योगाला सौदीने क्रीडा प्रकार म्हणूनही मान्यता दिली आहे. त्यामुळे सौदी अरबमध्ये आता विशिष्ट परवाना घेऊनच योग शिकवता येणार आहे.
 
विशेष असे की, नोफ मारवाई नावाच्या महिलेला सौदी अरेबियातील पहिली योग शिक्षीका म्हणून मान्यताही मिळाली आहे. योगाला क्रीडा प्रकार म्हणून सौदीत मान्यता मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे श्रेयही नोफलाच जाते. योगाला खेळाचा दर्जा मिळण्यासाठी नोफने प्रदीर्घ काळ एक अभियान चालवले होते. अरब योगा फाऊंडेशनची संस्थापक असलेल्या नोफचे म्हणने असे की, योगा आणि धर्म यांच्यात कोणत्याही प्रकारची गल्लत होऊ नये.