शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 नोव्हेंबर 2017 (17:08 IST)

ल्युईस फक्त १० महिन्यांचा वजन २८ किलो

healthy baby

मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या  ल्युईस फक्त १० महिन्यांचा आहे आणि त्याचे वजन त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कैकपटींनी अधिक आहे. सध्याच्या घडीला ल्युईसचं वजन २८ किलोंहूनही जास्त आहे. वजनामुळे ल्युईसची काळजी घेण्यास त्याच्या आई-वडिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

ल्युईस चार-एक महिन्यांचा असल्यापासून त्याची प्रकृती इतर मुलांच्या तुलनेत जास्तच सुदृढ असल्याने त्याची आई इसाबेल खूश होती. मात्र हळहळू ल्युईसचं वजन तिची चिंता अधिक वाढवू लागलं. इतर मुलांच्या तुलनेत त्याच्या शरीराचं वजन जास्त होतं. डॉक्टरही ल्युईसचं वजन पाहून चक्रावून गेले. कारण २८ किलो वजन असलेलं दहा महिन्यांचं मूल त्यांनीही यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. त्याचं वय नेमकं कशामुळे वाढलं यावरून डॉक्टरांमध्ये सध्या मतभेद आहेत.