बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (11:00 IST)

डोनाल्ड ट्रम्प यांनी केले मोदींचे कौतुक

भारताने आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर वेगाने आर्थिक विकास साधला आहे, त्यातून त्या देशातील मध्यमवर्गाला विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. एका परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतका विशाल देश अणि त्या देशातील जनता एकत्र ठेवण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न केल्याचेही कौतुक केले आहे.

एशिया-पॅसेफिक इकॉनॉमिक कौन्सिलच्या परिषदेनिमीत्त सीईओंच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की भारत आपल्या स्वातंत्र्याचे 70 वे वर्ष साजरे करीत आहे, 130 कोटी लोकसंख्या असलेला हा देश सार्वभौम लोकशाही आहे. भारतातील लोकशाहीं जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर या देशाने आर्थिक क्षेत्रात लक्षणीय यश मिळवले आहे.

इतका विशाल देश आणि त्या देशातील जनता एकत्र ठेवण्यासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत असेही त्यांनी नमूद केले.इंडो-पॅसिफिक प्रदेश हा अधिक खुला व्हावा आणि त्यात मुक्त व्यापाराला संधी मिळावी अशी अपेक्षाहीं त्यांनी व्यक्‍त केली.