गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

मुलगा मौलाना बनल्‍यामुळे दाऊद डिप्रेशनमध्ये

1993 मुंबई बॉम्‍ब स्‍फोटातील मोस्ट वॉटेंड आरोपी आणि कुख्‍यात अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिम नैराश्‍याच्‍या गर्तेत गेल्‍याची माहिती आहे. दाऊदचा एकुलता एक मुलगा फॅमिली बिझनेसमध्‍ये न शिरता मौलाना बनल्‍यामुळे दाऊद डिप्रेस झाल्‍याची माहिती आहे. 31 वर्षीय मोईन नवाज दाऊद कासकर हा दाऊदचा एकुलता एक मुलगा आहे. ठाण्‍याच्‍या अँटी एक्‍टॉर्शन सेलचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, ‘मोईन दाऊदच्‍या बेकायदेशीर कृत्‍यांच्‍या विरोधात होता. त्‍यामुळे संपूर्ण कुटुंबाची जगभरात बदनामी होत असल्‍याचे त्‍याचे म्‍हणणे आहे.’

दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकरच्‍या चौकशीदरम्‍यान ठाणे पोलिसांना ही माहिती मिळाली. प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, ‘दाऊदच्‍या अवैध धंद्यामुळे कुटुंबात अशांती निर्माण झाली होती. यामुळे मोईन खूप दु:खी झाला होता. त्‍यामुळे त्‍याने घर सोडण्‍याचा निर्णय घेतला.’कासकरने पोलिसांना सांगितले की, ‘मोईन एक चांगला मौलाना बनला आहे. कराची येथील क्लिफ्टन परिसरातील अलिशान बंगला सोडून त्‍याने जवळच्‍या एका मशिदीमध्‍ये आश्रय घेतला आहे. त्‍याची पत्‍नी सानिया आणि 3 मुलेही त्‍याच्‍यासोबत मशिदीमधील एका छोट्याशा घरात राहत आहे.’