गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

भारताचे भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय कोर्ट न्यायाधीश

भारताचे दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश बनले आहेत. ब्रिटनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांच्यासोबतच्या अटीतटीच्या लढतीत त्यांनी हा विजय मिळवला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 
आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये भारताच्या दलवीर भंडारींना सलग दुसऱ्यांदा न्यायाधीश होण्याचा मान मिळाला आहे. ब्रिटनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांच्यासोबतच्या लढतीत मोठ्या फरकानं निवडणूक जिंकत न्यायाधीशपदी विराजमान झाले आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यात ब्रिटननं आपलं नामांकन मागे घेतलं आणि भारताचे दलवीर भंडारी न्यायाधीशपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्त झाले.
 
दलवीर भंडारींनी सुरुवातीच्या 11 राऊंड्समध्ये मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे ब्रिटननं आपलं नामांकन मागे घेतलं. दलवीर भंडारींना या निवडणुकीत 183 मतं  मिळाली आहेत, यात सुरक्षा परिषदेच्या 15 मतांचाही समावेश आहे.