1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

20 सेकंदापूर्वी निघाली ट्रेन, रेल्वेने मागितली क्षमा

Japanese rail company apologises after train leaves 20 seconds early
जपान येथे रेल्वेचा संचलन करणारी एका कंपनीने एक ट्रेन 20 सेकंदापूर्वीच सोडण्यामुळे माफी मागितली आहे. यामुळे प्रवाशांना झालेल्या समस्येमुळे माफी मागण्यात आली. वेळ पाळणारे आणि आपल्या शिष्टतेमुळे दुनियेत ओळखल्या जाणार्‍या जपानची ही घटना हैराण करणारी आहे.
 
तोक्यो आणि त्याचे उत्तरी उपनगरांना जोडणारी सुकुबा एक्सप्रेस ट्रेन मिनामी नगरेयामा स्टेशनापासून 9.44.40 याऐवजी 9.44.20 वर रवाना झाली होती. सुकुबा एक्सप्रेस कंपनीकडून जाहीर माफीत म्हटले गेले की प्रवाशांना झालेल्या त्रासामुळे आम्ही क्षमा मागतो.
 
तसेच फर्मप्रमाणे यासंबंधात कुठलीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही अर्थात या घटनेमुळे कोणत्याही प्रवाशाची ट्रेन सुटलेले नाही. बुलेट ट्रेनसह जपानची रेल्वे प्रणाली आपल्या वक्तशीर पणासाठी प्रसिद्ध आहे.